Advertisement

कन्हान येथे फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा


कन्हान येथे फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा

कन्हान : - कन्हान केमिस्ट द्वारे फार्मासिस्ट दिवस शीतला माता मंदिर परिसरात गुरुवार ला उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमात अध्यक्ष पवन भिमनवार , जेष्ठ सदस्य राजेंद्र हटवार , राजेंद्र पोटभरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आॅनलाईन दवाई विक्री आणि अनैतिक डिस्काउंट चा निषेध करण्यात आला . कार्यक्रमात विविध प्रकरची जनजागृति करुन ऑनलाइन औषधे खरेदी करणे टाळा, तुमचे प्राण वाचवा , ऑनलाइन खरेदी केलेल्या औषधाचा दर्जा संशयास्पद आहे , तुमचा विश्वास असलेला फार्मासिस्ट हा खरा आरोग्य संरक्षक असतो , आणीबाणीतील मित्र हा तुमचा परिचित केमिस्ट आहे. 

कोणतीही सवलत चांगल्या आरोग्यापेक्षा चांगली नाही , रोह्याची सुरक्षितता ही तुमची ओळखीची केमिस्ट आहे , सवलतीच्या मोहात पडू नका ; खरी औषधे खरेदी करा , आपल्या प्रियजनांशी चांगले वागा , सवलतींचा मोह थांबवा ; आरोग्याशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घ्या , खोट्या जाहिराती टाळा ; तुमच्या परिचित केमिस्टकडून खरी औषधे खरेदी करा , वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्यांकडूनच औषधे खरेदी करा , सवलतीकडे लक्ष देऊ नका; बनावट औषधांपासून सावध रहा . असे आव्हाहन नागरिकांना केले आहे . या प्रसंगी शितल भिमणवार , कविता चव्हान , शुभांगी ढोबळे , दीपक तिवारी , महेश मंगतानी , प्रकाश ढोबळे , शशीकांत पोहकर , केशव महल्ले , हर्षल वैद्य , योगेश ईखार , रौनक चौकसे , रोशन किरपान , उमेश ठाकरे , इरिशाद सिद्धिकी , 

इरेशाद अहमद , मोहन जाधव , कृणाल नागदेवे , चेतन चोपडा सह आदि नागरिक उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या